जिंतूर तालुक्यात भुईमूग पिकाच्या क्षेत्रात कमालीची वाढ!

जिंतूर तालुक्यात भुईमूग पिकाच्या क्षेत्रात कमालीची वाढ!

जिंतूर (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा तसेच कोरोना लसींचा मोठा तुटवडा सध्या जाणवत आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे आता पाण्याचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. मात्र, मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिंतूर तालुक्यात भुईमूग पिकाच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली. त्यामुळे तालुक्याचे भुईमुगाचे सर्वसाधारण क्षेत्र 270 असताना प्रत्यक्षात 3,264 हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. याची टक्केवारी 1,208 टक्के एवढी असल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे व मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. यू.एन. आळसे यांनी तालुक्यातील केहाळ येथील कृषी भूषण शेतकऱ्याने लागवड केलेल्या वेगवेगळ्या उन्हाळी भुईमूग वाणांची नुकतीच भेट देऊन पहाणी केली. केहाळ येथे एकूण 21 एकर क्षेत्रावर टी.जी. 51, टी.जी. 37ए, टी. एल. जी. 45 या सुधारित वाणांची टोकण पद्धतीने लागवड केलेली असून, येथील कृषी भूषण शेतकरी मागील वीस वर्षापासून उन्हाळी भुईमूग बियाणांचे सातत्याने उत्पादन घेत आहेत. त्याचप्रमाणे जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी सतत करत असलेल्या प्रयोगाबाबत यावेळी उपस्थित अधिकारी व शेतकरी यांना सविस्तर माहिती घेतली.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub