कृषी कायद्यांविरोधात सूरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण!

कृषी कायद्यांविरोधात सूरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाले असून, यासाठी शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने देखील केली आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमलेले आहेत. दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्त शनिवार दि. 6 मार्च रोजी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमांना जोडणाऱ्या केएमपी एक्स्प्रेस मार्गावर 5 तासांची नाकाबंदी केली जाणार असून, सायंकाळी 4 वाजेपर्यंत शेतकरी केएमपी एक्स्प्रेस वे जाम करणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी टोल देखील भरण्यास मनाई करणार आहेत.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमलेले असून, शेकतकरी संघटना आणि सरकार यांच्यात बैठकीच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र सर्वच निष्फळ ठरल्या आहेत. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान, कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाले असून, यानिमित्त शनिवार दि. 6 मार्च रोजी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमांना जोडणाऱ्या केएमपी एक्स्प्रेस मार्गावर 5 तासांची नाकाबंदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मते ते पूर्ण शांततेत आंदोलन करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाने आवाहन केले आहे की, 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आंदोलकांनी काळी पट्टी बांधून निषेध नोंदवावा.

सिंघू सीमेवरुन शेतकरी कुंडली येथे जाऊन एक्स्प्रेस वे अडवणार आहेत. या मार्गावरील टोल प्लाझा देखील शेतकरी अडवणार आहेत. गाझीपूर सीमेवरुन शेतकरी डासना टोलकडे जातील. टिकरी सीमेजवळील बहादूरगडची सीमा देखील शेतकरी आंदोलक जाम करणार आहेत. तसेच शहाजहानपूर सीमेवर बसलेले शेतकरी आंदोलक गुरुग्राम-मानेसरहून जाणारा केएमपी एक्स्प्रेस वे जाम करणार आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने असेही सांगण्यात आले आहे की, ज्या सीमांवर टोल नाके जवळ असतील त्या देखील ब्लॉक केल्या जातील. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने सर्वसामान्यांना विनंती केली आहे की, या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी घरे आणि कार्यालये येथे काळे झेंडे लावावेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub