उभे पिक वाया गेल्याने शेतकरी महिलेची आत्महत्या

उभे पिक वाया गेल्याने शेतकरी महिलेची आत्महत्या

सेलू (प्रतिनिधी) : राज्यात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पावसाची हजेरी सुरूच आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे शेतातील उभ्या कापसाचे नुकसान झाल्याने सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी शिवारात एका 55 वर्षीय शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

राज्यात यावर्षी धुवाधार पावसाची नोंद झाली असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाला आहे. मात्र या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, उसाचे पीक भुईसपाट झाले. भात, सोयाबीन, कापूस, मका आणि फळबागांचेही नुकसान वाढले आहे. दरम्यान, शेतातील उभ्या कापसाचे नुकसान झाल्याने सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी शिवारात मंगळवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास कमलबाई बळीराम शिंपले या शेतकरी महिलेने आत्महत्या केली.

सततच्या पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाल्याने कमलबाई चिंतेत होत्या. त्यामुळे त्या 10 ऑक्टोबर रोजी दुपारी आपल्या शेतात पाहणीसाठी गेल्या होत्या. रात्री उशीर झाला तरीही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. मंगळवारी सकाळी त्यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला त्यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. आर्थिक विवंचना आल्याने त्या नैराश्यात होत्या. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कमलबाई यांचा मुलगा अर्जुन शिंपले यांने दिली आहे.

राज्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाची हजेरी सुरूच आहे. राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नैराश्य झालेल्या कमलबाई बळीराम शिंपले या शेतकरी महिलेने आत्महत्या केली असून, सेलू पोलीस स्थानकात आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोडतीर्थ पोलीस कर्मचारी सुनील वासलवार यांनी जाऊन पंचनामा केला असून, अधिक तपास बीट जमादार शेख गौस हे करत आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *