कोरोनानंतर अवकाळी तरिही हरला नाही शेतकरी!

कोरोनानंतर अवकाळी तरिही हरला नाही शेतकरी!

परभणी (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून, व्यवसाय ठप्प पडले, हाताला काम नाही, अनेकांचे रोजगार गेलेत अशी एक ना अनेक कारणे दाखवित अनेक जण रड्याची भूमिका घेतांना दिसत आहेत. परंतू याच समाजात वावरत असलेला व हजार वेळा विपरित परिस्थितीमुळे कोसळलेला जिल्हयातील शेतकरी कोरोनानंतर अवकाळी पावसाला देखील हरला नाही. पुन्हा त्याच जिद्दीने खरीपाच्या तयारीला लागला असून, जगाच्या पोशिंद्याची ही जिद्द अनेकांना प्रेरणादायी ठरणारी आहे.

कोरोना विषाणु संसर्गानंतर अवघ्या जगातील उद्योग, व्यवसाय बंद पडले. करोडो रुपयांचे नुकसान झाले. त्याचा मोठा फटका कृषी क्षेत्रालाही बसला. गतवर्षीचे सलग तीन महिने तर शेतकऱ्यांची कंबर मोडणारे ठरले होते. कारण अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे शेतमाल शेतातच सडून गेला होता. हे नुकसान हजारो नाही तर अब्जो रुपयांच्या घरात गेले असावे. ज्यांनी कसे बसे शेतीतून उत्पादन घेवून बाजारपेठ गाठण्याचा प्रयत्न केला, त्यांना मोठ्या त्रासातून जावे लागले. काहींनी तर चक्क शेताच्या धुऱ्यावर किंवा शेतरस्त्यावर फळ व भाजीपाला फेकून दिला, अशा विदारक परिस्थितीतून आजही शेतकरी मार्गक्रमण करतो आहे.

कोरोनाकाळात अनेकदा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळीमुळे देखील अनेकांचे आर्थिक नुकसाने झाले तर काहींनी आपले प्राण देखील गमावले. मात्र, या सर्व परिस्थितीला तोंड देत कोणत्याच संकटाचा बावू न करता तो परत उद्याची सुख स्वप्ने डोळ्यात साठवून खरीपाच्या तयारीला त्याच जोमाने लागला आहे. त्याची जिद्द व मेहनत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub