कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार!

कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला देखील सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पुन्हा निर्बंध घालण्यात येत आहेत. दरम्यान, राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून सुरु झालेले असून, कोरोना काळात महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन सोमवार दि. 8 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला.

राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून सुरु झालेले असून, सोमवार दि. 8 मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावेळी पवार म्हणाले की, कोरोना काळात सर्व क्षेत्रात मंदी असताना राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली. या काळात राज्यातील कृषी आणि सलग्न क्षेत्रात 11.7 टक्के इतकी भरघोस वाढ पहायला मिळाली. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषीमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला असल्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितले.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला असून 31 लाख 23 हजार शेतककऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, तीन लाखांपर्यंत मर्यादीत कर्ज घेणाऱ्या आणि त्याची परतफेड वेळेत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची घोषणा देखील यावेळी अजित पवार यांनी केली आहे. तसेच एपीएमसीच्या बळकटीसाठी 2 हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर केले असून, पशुसंवर्धन आणि मत्स्य योजनेसाठी 3700 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub