केंद्राने ऊस दराचा निर्णय सोपवला राज्य सरकारच्या खांद्यावर

केंद्राने ऊस दराचा निर्णय सोपवला राज्य सरकारच्या खांद्यावर

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर होत्या. शासनाचे नियंत्रण आणि कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी किमती वाढविल्या नाहीत. पण हळूहळू पालेभाज्या तथा फळभाज्या यांच्या किमतीत वाढ होऊ लागली. सरकारने कितीही दावे केले की महागाई आटोक्यात आहे, तरी वास्तव काही वेगळेच आहे. दरम्यान, ऊस गळीप हंगामाच्या तोंडावर ऊस दराचा निर्णय केंद्राने आता राज्य सरकारच्या खांद्यावर सोपवला असून, शेतकरी संघटनांनी या निर्णयामुळे सरकार आणि कारखानादारांकडून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ऊसाच्या दरावरून आजपर्यंत शेतकरी संघटना, साखर कारखानदार आणि राज्य शासन यांच्यात अनेक वेळा संघर्ष झालेला आहे, आणि एफआरपी हा नेहमीच संघर्षाचा केंद्रबिंदू राहिला आहे. ही एफआरपी ठरवण्याचे सर्वाधिकार केंद्राकडे राहिले आहेत. त्यामुळे राज्य शासन, कारखानादार नेहमीच केंद्राकडे बोट दाखवत आले आहेत. आता ऊसाचा गळीत हंगाम सुरु होत आहे आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एफआरपी कायद्याबाबतचा असणारा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे राज्य सरकारवर निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्राने सोपवली असून, याबाबतची अधिसूचना केंद्राने जारी केली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये संभ्रम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारखानदारांच्या मते आतापर्यंत एफआरपी अंतिम केंद्र ठरवणार आहे आणि केंद्राने सध्या जी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने केवळ राज्यातल्या त्या-त्या कारखान्यांच्या रिकव्हरी रेट प्रमाणे दर जाहीर करण्याचे किंबहुना अंमलबजावणीचे काम करायचे आहे. पण पार्टी ठरवण्याचे अधिकार हे केंद्रीय कृषिमूल्य आयोगाडेच आहेत. केवळ आता त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही राज्य सरकारवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम एफआरपी किंवा दरावर होणार नसल्याचे कारखानदारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला शेतकरी संघटनांमध्ये यावरून मतांतर आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub