तुरीच्या बाजारभावाने गाठला उच्चांक!

तुरीच्या बाजारभावाने गाठला उच्चांक!

वाशिम (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर होत्या. शासनाचे नियंत्रण आणि कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी डाळींच्या किमती वाढविल्या नाहीत. पण कच्च्या मालाचा तुटवडा होऊ लागताच फिनिश मालाच्या किमतीत वाढ होऊ लागली. एकीकडे शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळावा म्हणून प्रतीक्षेत असतो. मात्र असे असले तरी वाशिमच्या बाजार समितीमध्ये शेतकरी आपल्याकडे असलेल्या तुरीच्या विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे.

वाशिमच्या बाजार समितीमध्ये सध्या तुरीच्या विक्रीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्याचे मोठे कारण म्हणजे तुरीच्या पिकाला मिळणारा जादा दर. बुधवारी पुन्हा तुरीच्या भावामध्ये 100 रुपयांची वाढ झाली असून आता 9500 रुपये प्रती क्विंटल दराने तुरीची डाळ विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता जादा दर मिळत असल्याचा आनंद दिसत असून, तुरीच्या बाजारभावाने सहा वर्षांत पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे.

2014 मध्ये 13 हजार रुपये प्रती क्विंटल दराने विक्रीनंतर, गेल्या सहा वर्षात तूर विक्रीसाठी मोठ्या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. आता बाजार समितीमध्ये तुरीला शासकीय हमीभावापेक्षा अडीच ते साडे तीन हजार रुपयांचा अधिकचा दर मिळत आहे. लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार थांबले होते. अनलॉक प्रक्रियेत हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले असून, मागणी वाढल्याने तुरीचे दर वाढले असल्याचे बोलले जात आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *