सुशांतच्या मृत्युनंतर 80 हजार फेक अकाऊंट्स उघडली गेली : सायबर सेल

सुशांतच्या मृत्युनंतर 80 हजार फेक अकाऊंट्स उघडली गेली : सायबर सेल

मुंबई (प्रतिनिधी) : सुशांत सिंग राजपूत याने आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसताना, एम्स रुग्णालयाकडून सुशांतच्या आत्महत्येवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा जो तपास सुरु झाला त्यावेळी मुंबई पोलिसांच्या कामकाजवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला असून, हा तपास अंमली पदार्थापर्यंत आला.

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्युनंतर जो तपास सुरु झाला त्यावरून मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मुंबई पोलीस कसे वेगळा अजेंडा राबवत आहेत, त्यांना कशा पद्धतीने काही लोकांना लपवायचे आहे अशा अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. केवळ मुंबई पोलीसच नव्हे तर राज्य सरकारलाही याची धग जाणवली. आता एकीकडे एम्सच्या अहवालानुसार सुशांतने आत्महत्या केल्याचे सिद्ध होत असतानाच मुंबई पोलिसांनीही जरा कंबर कसली आहे.

राज्य सरकार असो किंवा मुंबई पोलीस असो सोशल मीडियावर या दोघांविरोधात बराच मजकूर लिहिला गेला. मुंबई सायबर सेल अशा अनेक अकाऊंट्सची तपासणी करताना दिसू लागली आहे. सायबर सेलने दिलेल्या अहवालानुसार, मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांची बदनामी करण्यासाठी तब्बल 80 हजार अकाऊंट्स नव्याने उघडली गेली आणि ती बनावट होती. एरव्ही मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही बोलताना दिसत नाही. कारण मुंबई पोलिसांनी आपल्या कामगिरीने जगात लौकिक मिळवला आहे.

सायबर सेलने दिलेल्या अहवालानुसार, सुशातच्या मृत्यूनंतर लगेचच 14 जूनपासून तब्बल 80 हजार अकाऊंट्स उघडली गेली. ही 80 हजार अकाऊंट्स भारतातून न उघडता परदेशातून उघडण्यावर भर दिला गेला. यात तुर्की, इंडोनेशिया, जपान, थायलंड आदी देशांचा समावेश होतो. सायबर सेल आता या अकाऊंट्सचाही तपास करत आहे. केवळ राज्य सरकारची बदनामी करणे, मुंबई पोलिसांबद्दल अपप्रचार करणे हे दोन उद्देश समोर ठेवूनच ही अकाउंट्स काम करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub