हाथरस प्रकरणातील आरोपींचे उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र

हाथरस प्रकरणातील आरोपींचे उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र

उत्तर प्रदेश (प्रतिनिधी) : कोरोनामुळे देशातील परिस्थिती खुप गंभीर झाली आहे. देशात एकीकडे कोरोनाचे वर्चस्व आहे तर दुसरीकडे एकापाठोपाठ एक धक्कादायक घटना घडत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पिडित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. आता मात्र हाथरस प्रकरणाला नवीन वळण आले आहे.

हाथरस प्रकरणातील चारही आरोपींनी जेलमधून उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहले असून त्या पत्रात आपण निर्दोष असल्याचे चारही आरोपिंनी सांगितले आहे. पत्रात आरोपींनी नमूद केले आहे की, या आरोपींची पीडितेसोबत मैत्री होती. त्यांचे एकमेकांसोबत बोलणेही होत. परंतु, पीडितेला मारहाण आरोपींनी केलेली नाही. तर पीडितेची आई आणि भावाने केलेली आहे. या मारहाणीनंतरच पीडितेचा मृत्यू झाला. पत्रात चारही आरोपी संदीप, रामू, रवी आणि लवकुश यांच्या सह्या आणि अंगठ्याचे ठसेही आहेत.

हाथरस प्रकरणी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) तपास करत असून बुधवारी एसआयटी आपला अहवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपावणार होती. मात्र एसआयटीला आणखी दहा दिवसांचा अवधी मिळाला आहे. गृहसचिव भगवान स्वरुप यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचा तपास सुरु असून, या प्रकरणात एसआयटीला तपासासाठी एक आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. दरम्यान तपसासाठी आणखी 10 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *