अपंग मुलीवर दिवाळीच्या दिवशीच बलात्कार

अपंग मुलीवर दिवाळीच्या दिवशीच बलात्कार

बुलढाणा (प्रतिनिधी) : देशात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे धक्कादायक घटना थांबण्याचे नावच घेत नाही. कोरोनाच्या या काळात उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण त्यानंतर हरयाणामधील बल्लभगड येथे एका विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या या घटना ताज्या असतानाच शनिवार दि. 14 नोव्हेंबर रोजी बीड येथे तरुणीवर ऍसिड हल्ला. यादरम्यान, बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा खुर्द येथे एका नराधमाने अपंग मुलीवर दिवाळीच्या दिवशी दुपारी बलात्कार केल्याची घटना घडली.

काकनवाडा खुर्द येथील आरोपी सोपान गजानन रसाळे याने एका 21 वर्षीय जन्मत: बोलता येत नसलेल्या अपंग मुलीला शौचालयात नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. घटनेच्या वेळी मुलगी व तिची आई नळावरून पाणी भरत होती. रिकामे भांडे भरून आणण्यासाठी गेलेली मुलगी बराच वेळ घरी परतली नाही. जवळच एका घरासमोरील प्रसाधनगृहात ती रडत असल्याचा आवाज आल्यावर पाहिले असता आरोपी सोपान रसाळे बळजबरीने अत्याचार करीत असल्याचे दिसून आले. दरम्यान, आरोपीला चोप देऊन पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला.

कोरोनाच्या या काळात घडीत असलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहेत. देशात होत असलेल्या अशा घटनांमुळे लोकांचा राग शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा खुर्द येथे अपंग मुलीवर दिवाळीच्या दिवशी दुपारी बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस ठाणे येथे आरोपी सोपान गजानन रसाळे याच्या विरूद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *