भरधाव ऑटोरिक्षाचा अपघातकरून पतीने केला पत्नीचा खून

भरधाव ऑटोरिक्षाचा अपघातकरून पतीने केला पत्नीचा खून

गंगाखेड (प्रतिनिधी) : देशात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे धक्कादायक घटना थांबण्याचे नावच घेत नाही. कोरोनाच्या या काळात उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण त्यानंतर हरयाणामधील बल्लभगड येथे एका विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या या घटना ताज्या असतानाच गुरूवार दि. 19 नोव्हेंबर रोजी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास पतीने भरधाव वेगातील ऑटोरिक्षाचा अपघातकरून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना गंगाखेड तालुक्यातील कोद्री शिवारातील माळरानावर घडली.

गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील सिद्धेश्वर तिडके यांची मोठी बहिण कौशल्या यावर्षी माहेरी गेल्या नाही. यामुळे तिला भेटण्यासाठी सिद्धेश्वर गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उंडेगावला आले. परमेश्वरचा रागीट स्वभाव असल्याने सिद्धेश्वर केवळ चहा घेऊन अर्ध्या तासात परत गेला. याची माहिती कळल्यानंतर रात्री 7:30 वाजेच्या सुमारास परमेश्वरने सिद्धेश्वरला फोन करून, “तू माझ्या घरी कशासाठी आला होता” असे विचारात शिवीगाळ केली. यानंतर कौशल्याला, “तुझ्या भावाला बोलावून घे नाहीतर तुला खपवून टाकीन” अशी धमकी दिली.

कौशल्याने घाबरत फोनवरच भावाला लगेच येण्याचे सांगितले. यामुळे सिद्धेश्वर आई-वडीलांसह उंडेगावकडे निघाला. दरम्यान, परमेश्वरने कौशल्याला ऑटोरिक्षात (एम एच 22 एच 2104) बसवून भरधाव वेगात नेल्याची माहिती सिद्धेश्वरला समजली. त्याने तत्काळ परमेश्वरला मोबाईलवर फोन केला. तेव्हा त्याने कौशल्या मृत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी सिद्धेश्वर याच्या फिर्यादीवरून शुक्रवार दि. 20 नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश राठोड हे करीत आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub