बेजबाबदार वाहन चालवणाऱ्यांना बसणार मोठा दंड

बेजबाबदार वाहन चालवणाऱ्यांना बसणार मोठा दंड

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, सध्यस्थितीत देशात लसीकरणाला देखील सूरूवात झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात रस्ते अपघातांच्या घटना काहीश्या थांबल्या होत्या, मात्र अनलॉक झाल्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले असून, ड्रंक अँड ड्राईव्ह अर्थात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांना 10 हजार रुपये आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

राज्य सरकाने केंद्रीय मोटर वाहन दुरुस्ती कायदा (2019) हा जवळपास एका वर्षासाठी रोखून धरला होता. ज्या धर्तीवर नवा दंड कायदाही लागू करण्यात आला नव्हता. पण, आता तो लागू करण्याचे संकेत आणि त्याबाबतचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांना 10 हजार रुपये आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठवण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. इतकेच नव्हे, तर रिक्षा आणि टॅक्सीसाठी नवे परमिट देणेही थांबवण्यात येणार असून, रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

राज्य सरकार वाहतूक विभाग आता अधिकत कठोर होताना दिसत असून, राज्यात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, विनापरवाना वाहन चालवणे, वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणाऱ्यांना मोठा दंड बसणार आहे. रस्ते वाहतुक आणि एकंदरच राज्यातील वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणत बेजबाबदार वाहन चालकांवर चाप बसवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे किमान वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub