भ्रष्टाचाऱ्यांच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम

भ्रष्टाचाऱ्यांच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती खुप गंभीर झाली आहे. एकीकडे कोरोनाचे वर्चस्व तर दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटना घडतच आहेत. गुन्हेगारी सोबतच देशात तथा महाराष्ट्रात भ्रष्टाचार देखील वाढला आहे. दरम्यान, देशातील भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 14.9 टक्केच भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली असून, राष्ट्रीय गुन्हा नोंद विभाग म्हणजेच एनसीआरबी ने स्वत: ही माहिती जाहीर केली आहे.

एनसीआरबी ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्ह्यांची संख्या दुप्पट आहे. भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यात अनेक नागरिक पुढे येत असल्याने भ्रष्टाचाराचे गुन्हे अधिक असण्यास कारणीभूत ठरले आहे. एनसीबीने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 891 भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रानंतर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर असून, राजस्थानमध्ये 424 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाणबाबत महाराष्ट्र शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात भ्रष्टाचाराच्या 866 प्रकरणात सापळे रचून कारवाई करण्यात आली आहे. या पैकी 370 गुन्ह्यांमध्ये खटला पूर्ण झाला असून त्यातील 55 गुन्ह्यांमधील आरोपींनाच शिक्षा झाली असून, 294 गुन्ह्यांमध्ये आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. तर 21 गुन्ह्यांमध्ये पुराव्या अभावी गुन्हे मागे घेण्यास न्यायालयाने सांगितले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *