हाथरस प्रकरणातील आरोपींना जबर शिक्षा झाली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

हाथरस प्रकरणातील आरोपींना जबर शिक्षा झाली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे देशातील परिस्थिती खुप गंभीर झाली आहे. देशात एकीकडे कोरोनाचे वर्चस्व आहे तर दुसरीकडे एकापाठोपाठ एक धक्कादायक घटना घडत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पिडित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. असे कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही जबर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार म्हणाले की, हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणी सबंधित सरकारने न्यायालयीन प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन आरोपींना त्यांच्या पापाचे फळ लवकरात लवकर द्यावे. न्यायालयाच्या माध्यमातून आरोपींना कठोर शिक्षा देत असतानाच स्त्रीशक्तीचा आदर करणाऱ्या सभ्य समाजनिर्मितीची जबाबदारीही आपल्या सर्वांची आहे. महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक होईल, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले की, हाथरस येथील घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे, असे कृत्य करणारे नराधम समाजात आहेत हे सहन होण्यापलीकडे आहे. या प्रकरणातील आरोपींना जबर शिक्षा झालीच पाहिजे. हाथरसची घटना ही या देशातील शेवटची घटना ठरावी यासाठी शासन, न्यायालय आणि समाज सर्वजण मिळून प्रयत्न करतील, आपापली जबाबदारी पार पाडतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published.