कोरोनाच्या नावावर पत्नीनेच केला पतीचा खुन!

कोरोनाच्या नावावर पत्नीनेच केला पतीचा खुन!

पुणे (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. देशात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाही. आता पर्यंत कोरोनामुळे लोकांचा जीव जात होते आता मात्र, कोरोनाच्या नावावर लोकांचे जीव जायला लागले आहेत, हे खरचे दुर्दैव आहे. परंतु गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या हुशारी पुढे, त्यांचा सुगाव लागणार नसून, कोरोनाच्या नावावर पत्नीनेच आपल्या पतीचा खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यातील एका 19 वर्षीय पत्नीने आपल्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर त्याची गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर त्या महिलेने सगळ्यांना सांगितले की, तिच्या नवऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 24 मे रोजी सकाळी मनोहरचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर त्याची पत्नी अश्विनीने पोलिसांना कळवले. परंतु पोलिसांना आश्विनीच्या कहाणीवर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरवात केली आणि या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी केली. त्या दरम्यान त्यांच्या लक्षात आले की, मनोहरला अनेक दिवसांपूर्वी कोरोना झाला होता आणि तो यातून बरा देखील झाला होता. त्यानंतर पोलिसांचा संशय खरा ठरला जेव्हा त्यांनी आश्विनीचे कॉल रेकॉर्ड चेक केले.

पोलिस निरिक्षक यांच्या टीमने आश्विनीच्या कॉल रेकॉर्ड पाहिले तेव्हा त्यांना खुलासा झाला की, तिचा एक गौरव सुतार नावाचा मित्र आहे. ज्याच्या सोबत ती तासन-तास बोलत बसायची. त्यांनंतर पोलिसांना समजले की, गौरव हा मनोहरच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांच्या घरी आला होता. त्यानंतर पोलिसांचा संशय आणखी पक्का झाला. चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या समोर आले की, आश्विनी आणि गौरवचे नाते मैत्रीच्या पुढे गेल्याने त्यांनी मनोहरला मारायचे ठरवले. त्यासाठी गौरवने आश्विनीला झोपेच्या गोळ्यांचे पॅकेट आणून दिले. त्यातल्या काही गोळ्या दुधात टाकून मनोहरला त्यांनी बेशुद्ध केले आणि दोघांनी मिळून मनोहरचा गळा दाबून हत्या केली. या सगळ्या गोष्टीचा खुलासा होताच पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub