दिव्यांचा सण “दिवाळी”

दिव्यांचा सण “दिवाळी”

भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी; दिवाळीला दीपावली सुध्दा म्हणतात. दिवाळी म्हणजे दिव्यांची ओळ किंवा रांग! दिवाळी म्हणजे आनंदी जीवनाचा प्रारंभ! भारतात सर्व धर्मीय लोक दिवाळी मोठ्या आनंदात साजरी करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विनच्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरी केली जाते. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्व लोक आजही जाणतात.

दरवर्षी दिवाळी अंधाऱ्या रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाईनी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात. दरम्यान, दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धयाला परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता. असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषनाई ने जगमगुण गेला होता. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.

दिवाळीचा प्रत्येक दिवस असुरांचा संहार

प्रत्येक-दिवस

दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन व बलिप्रतिपदा असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. कृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हापासून नरकचतुर्दशी साजरी करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा, यासाठी धार्मिक कृती करतात. बलीप्रतिपदा बली राजाचा नाश झाल्याचे प्रतीक आहे. तर भाऊबीज ही शकटासुर या असुराचा नाश करून असंख्य भगिनींना त्यांचा बंधू कृष्ण याने सोडवल्याचा आनंद म्हणून साजरी करतात. अशा तर्हेुने दिवाळीचा प्रत्येक दिवस हा असुरांचा संहार केल्याच्या, धर्माने अधर्मावर विजय मिळवल्याच्या दिवसाची आठवण म्हणून मंगलमय दीपांनी उजळवायचा, असे आपली संस्कृती सांगते.

दिवाळीला आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात. त्याबरोबर घरात चारही बाजूंना तेलाचे दिपक एका रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळीला “दिपोत्सव” म्हणून ओळखली जाते. या दिवसासाठी बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. मुख्यतः महिला ह्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. दिवाळी साजरी करण्यामागे जरी कोणतेही कारण असो बाजारात या सणा दरम्यान फारच उत्साहाचे वातावरण असते. दर वर्षी लोक मिठाई, कपडे आणि जरुरी वस्तू तसेच आभूषनाच्या दुकानावर मोठी गर्दी करतात. सामान्य मानुसही यावेळी मनमोकळेपणे खरेदी करतो.

दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे. भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीती प्रमाणे यास साजरा करतात त्यामुळे या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. पाच दिवस चालनारा हा उत्सव फारच मनोरंजक असतो. लोक एक दोन आठवड्या आधीच दिवाळीची तयार सुरु करून देतात, त्यामध्ये घराची साफसफाई आणि रंगरंगोटी चा समावेश होतो. कपडे आणि जरुरी वस्तू एक-दोन आठवड्या पूर्वीच खरेदी केले जातात. घरात आणि दुकानात फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवले जाते. आकाश कंदील घरासमोर लावल्या जातो.

भारत हा असा देश आहे कि, जेथे विविध जातीधर्माचे समुदाय एकसाथ एका बंधनात राहतात आणि एकमेकाचे सन मोठ्या आनंदात साजरे करतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना कमी भेटतात त्यावेळी दिवाळीचा सण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याच्या आनंदमयी संधी घेवून येते. लोक एकमेकांना शुभकामना देवून आणि उपहार व दिवाळीचे मिष्ठान्न देवून आपले नाते अधिक बळकट बनवतात. दरम्यान, आजच्या काळात सर्व देशवासी पर्यावरणाला होत असलेल्या नुकसानाबाबत जागृत आहेत त्यामुळे बरेच परिवार प्रदूषण रहित दिवाळी साजरी करतात. दिवाळीत हानिकारक फटाके फोडले जात नाहीत. शाळा आणि इतर संस्थांमध्ये तसेच भारत सरकारही नागरिकांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची विनंती करतात.

कोरोना काळातील दिवाळी

कोरोनादिवाळी

दरम्यान, यंदा देशात कोरोनाचा संकट असल्यामुळे अनेक प्रथा, परंपरा मोडित निघाल्या असून, ऑनलाईन दसरा साजरा करण्यात आला आहे. जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण देश हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. आता मात्र, कोरोनाचा आलेख खाली येत असतानाच देशाची चिंता दिवाळीमुळे वाढली आहे. या काळात लोकांची गर्दी वाढेल आणि एकत्र येणंही वाढेल, त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर थंडी वाढल्याने दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात दिवाळी असल्याने सगळ्यांनी काळजीपूर्वक हा सण साजरा करावा असे आवाहनही केले जात आहे.

कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. हिवाळ्यात आधीच प्रदुषणात वाढ होते. त्यात फटाक्यामुळे जास्त प्रदुषण होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच यंदा कोरोनाच्या काळामध्ये प्रदूषणामुळे श्वसनाच्या विकारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फटाके विरहित दिवाळी साजरी करणे गरजेचे झाले आहे. म्हणून, दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी. तसेच यंदाची दिवाळी घरगुती पद्धतीने आणि साध्या स्वरूपात साजरी करावी. चला तर मग आपण हि येणारी दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याचा संकल्प करूया आणि देशांच्या हितामध्ये आपलेपण योगदान देवूया.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub