5 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार अंतिम वर्षाची परीक्षा!

5 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार अंतिम वर्षाची परीक्षा!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, देशात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यानुसार, अंतिम वर्षाची परीक्षा ही 5 ऑक्टोंबर ते 28 ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्या शैक्षणिक वर्षासाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून 1 नोव्हेंबरपासून पहिल्या सेमिस्टरचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर, यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घरबसल्या ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न पद्धतीचा अवलंब केला जाणार असून, अंतिम सत्राची परीक्षा आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांचीही परीक्षा ऑनलाइनच घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रात होते, ते सर्व विद्यार्थी बॅकलॉग विषयांची परीक्षा देऊ शकतात. मात्र, त्यासाठी त्यांनी विद्यापीठाकडे अर्ज केलेले असावेत, असे देखील विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घरबसल्या ऑनलाइन होणार असून, परीक्षेसाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा पोर्टल बनविले आहे. ऑनलाइन परीक्षा सुरू असता नेटवर्क गेल्यास परीक्षा खंडित होऊ शकते. परंतु, प्रत्येक पेपर हा 90 मिनिटांचा असणार आहे. मोबाईलचे नेटवर्क गेल्यास पाच तासांत कधीही पेपर सोडविण्याची संधी विद्यार्थ्यांना आयोगाने दिली आहे. पेपर संपल्यानंतर आठवड्यात निकाल लावण्याची तयारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केली आहे.

दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्या शैक्षणिक वर्षासाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून 1 नोव्हेंबरपासून पहिल्या सेमिस्टरचे वर्ग सुरू करून, तिथून चार महिन्यांत 5 एप्रिलपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना विद्यापिठांना दिल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2021 पर्यंत परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सुटी देवून, 9 ते 21 ऑगस्टपर्यंत अंतिम वर्षाची परीक्षा घ्यावी आणि 30 ऑगस्ट 2021 पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात करावी, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत.

muzaffar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *