विद्यार्थ्याचा संभ्रम दूर करण्यासाठी बोर्डाकडून हेल्पलाइन

विद्यार्थ्याचा संभ्रम दूर करण्यासाठी बोर्डाकडून हेल्पलाइन

औरंगाबाद (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक सत्रातील दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, अकरावीच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाच्या सीईटी परिक्षेला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची मूल्यमापन कार्यपद्धती देखील जाहीर करण्यात आली असून, या कार्यपद्धतीसंदर्भात असलेल्या अडचणी तसेच शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळाकडून हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीची परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, परीक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण मंडळामार्फत जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, 2020-21 शैक्षणिक वर्षात आयोजित करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी केलेले खासगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे परीक्षार्थी यांच्या मूल्यमापनाबाबतचा तपशील व विषयनिहाय परिशिष्टे. याबाबतचे परिपत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन कार्यपद्धतीमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळाकडून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार मंडळाचे सहसचिव, सहायक सचिव तसेच अन्य अधिकारी संबंधितांना मार्गदर्शन करणार आहेत. औरंगाबाद विभागीय मंडळाकडून हेल्पलाइनसाठी सहसचिव राजेंद्र पाटील (मो.नं. 9922900825, 9421336801) व वरिष्ठ अधीक्षक आर.आर. गर्गे (मो.नं. 9423469712) यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub