MPSC परीक्षा पुढे ढकलल्या!

MPSC परीक्षा पुढे ढकलल्या!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, देशात तसेच राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1 आणि 22 नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा संयुक्त परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

राज्यात 11 ऑक्टोबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर पुढे ढकलत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. राज्यात 200 पेक्षी अधिक ठिकाणी परीक्षा होणार होत्या. मात्र कोरोना संकट वाढले, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सरासर विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत, ते पुढेही पात्रच राहणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले होते.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला. अशातच राज्यात एमपीएससी परीक्षा होणार होत्या. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले असून MPSC परिक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा यशावकाश जाहीर करण्यात येतील असे महाराष्ट्र आयोगाने म्हटले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *