अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेसाठी नवा फॉर्म्युला!

अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेसाठी नवा फॉर्म्युला!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर, राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक सत्रातील दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सध्या अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अफाट आहे. मात्र, अकरावीच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाच्या सीईटी परिक्षेला सामोरे जावे लागणार असून, या परिक्षेविषयी सिस्कॉम संस्थेने सरकारला नवा फॉर्म्युला दिला आहे. या फॉर्म्युलामुळे विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेणे जास्त सोयीस्कर ठरणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने सीईटी घेण्यासाठी नुकताच जीआर जारी केला आहे. मात्र, या सीईटीच्या धोरणात करिअर निवडीबाबत अस्पष्टता आहे. त्यामुळे पुढे गोंधळ निर्माण होणार आहे. यामुळेच सिस्कॉम संस्थेने ही परीक्षा कशी घ्यावी यासाठीच्या काही उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यात संस्थेने सीईटी ही केवळ 100 गुणांची घेण्यापेक्षा त्याच्या जोडीला दहावीचे तीन शास्त्र, भाषा, इतिहास, भूगोल आणि गणित या विषयांची सीईटी परीक्षा घेण्यात यावी. तसेच कोरोना काळात दहावीची परीक्षा झाली नसल्याने या परीक्षेच्या संदर्भात भरण्यात आलेल्या शुल्कातूनच सीईटीची परीक्षा घेतली जावी. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारले जाऊ नये, असे सिस्कॉम संस्थेच्या शिक्षण विभाग प्रमुख वैशाली बाफना यांनी सांगितले आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीसाठी 6 विषय असल्याने सीईटीच्या 100 गुणांमध्ये सर्व विषयांचा समावेश नेमका कसा करता येईल, याबाबत सिस्कॉम संस्थेच्या शिक्षण विभाग प्रमुख वैशाली बाफना यांनी शंका व्यक्त केली. तसेच ही परीक्षा एकाच दिवशी अर्ध्या तासाच्या अंतराने दोन भागात घ्यावी. यामुळे एकत्र विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होईल. सरासरी गुणांच्या आधारे प्रवेश देता येईल. तसेच विद्यार्थी कोणत्या विभागात उत्तम करियर करू शकतो. याचा विद्यार्थी व पालकांना अंदाज घेता येईल, असेही बाफना यांनी स्पष्ट केले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub