राज्यात सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या!

राज्यात सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, देशात तसेच राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. त्यानुसार, अंतिम वर्षाची परीक्षा ही 5 ऑक्टोंबर ते 28 ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे. मात्र, राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटीच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा घेण्याचे आधी जाहीर केले गेले होते. तर दुसरीकडे अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्यभरात 1 ते 21 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार असल्याचे राज्यभरातील अकृषी विद्यापीठांनी ठरवले. त्यानंतर अंतिम वर्ष परीक्षेदरम्यान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या परीक्षा येत असल्याने आता या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यभरात अंतिम वर्ष परीक्षा देणारे विद्यार्थी त्याच दरम्यान होणाऱ्या सीईटी परीक्षा कशा देणार? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर होता. अखेर या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या समोरचा संभ्रम आता दूर करण्यात आला आहे. सीईटी प्रवेश परीक्षा या ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या, चौथ्या तर काही सीईटी प्रवेश परीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे जाहीर केले आहे. सीईटी परीक्षेबाबतचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *