राज्यातील शाळा दिवाळीनंतर होणार सुरू : बच्चू कडू

राज्यातील शाळा दिवाळीनंतर होणार सुरू : बच्चू कडू

अमरावती (प्रतिनिधी) : कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, देशात तसेच राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशात तथा राज्यातील शाळा तसेच कॉलेज हे सर्व मार्च महिन्यापासून बंद करण्यात आलेले आहे. मात्र शाळा कधी सुरू होणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.

राज्यातील शाळा तसेच कॉलेज हे दिवाळीनंतर सुरू करण्यात येणार असून, पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहे. तर पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. कोरोनाच्या संकटातून सावध पावले टाकत केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर राज्यातील सर्व शाळा तसेच कॉलेज बंद होती. आता मात्र शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची तयारी राज्य सरकार करत आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी एक धोरण आखण्यात येणार आहे. या धोरणामुळे विद्यार्थामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याची काळजी घेतली जाणार असून, सर्व नियम व अटी ठेवूनच विद्यार्थाना प्रवेश दिला जाणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *