राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून होणार सुरु!

राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून होणार सुरु!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, देशात तसेच राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर, महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही जिल्ह्यातील फक्त नववी ते बारावीचे वर्ग सूरू करण्यात आलेले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या वर्गातील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवार दि. 15 जानेवारी रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली.

सरकारच्या परवानगीनंतर राज्यातील काही जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबर पासून सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने कोरोनाचा कोणत्याही प्रकारच्या प्रार्दुभावाने विद्यार्थी व शिक्षक संक्रमित झाले नाहीत ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. आता मात्र, राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होणार, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली.

शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन 2025 चे सादरीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले. यावेळी राज्यातील शाळांच्या गुणावत्तेचा जिल्हा निहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाय योजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्याचे शालेय शिक्षणाचे व्हिजन तयार करित असताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छता हा विषयावर अधिक लक्ष देण्यात यावे.आताच्या काळात व्यावसायिक शिक्षण महत्वपूर्ण ठरत असल्याने विद्यार्थ्यांना आठवीपासूनच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात यावे. शैक्षणिक आणि पायाभूत सुधारणा करण्यासाठी दरवर्षाचा कार्यक्रम तयार करावा आणि त्यासाठी दरवर्षी किती निधी लागेल याप्रमाणे तरतूद करण्यात यावी.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub