दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, देशात तसेच राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशात तथा राज्यातील शाळा तसेच कॉलेज हे सर्व मार्च महिन्यापासून बंद करण्यात आलेले आहे. आता मात्र परिस्थिती हळूहळू पूर्व पदावर येत असून, दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, बोर्डाकडून दहावी आणि बारावी 2020 पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावी बोर्डाची पुरवणी परीक्षा ही 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान होणार, तर बारावी बोर्डाची पुरवणी परीक्षा ही 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर राज्यातील सर्व शाळा तसेच कॉलेज बंद करण्यात आली होती. तसेच अनेक परिक्षा देखील रद्द करण्यात आल्या होत्या. आता मात्र शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची तयारी राज्य सरकार करत आहे. दरम्यान, बोर्डाकडून दहावी आणि बारावी 2020 पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दरवर्षी दहावी-बारावीच्या निकालानंतर जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते. यंदा मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे या परिक्षा नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान घेतली जात आहे.

यंदा कोरोना संसर्गामुळे पुरवणी परीक्षेबाबत काहीच स्पष्टता नव्हती. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र राज्य मंडळाने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दहावी आणि बारावीच्या फेर परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेतल्या जाणार असून, परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *