दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा ठरल्या!

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा ठरल्या!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, देशात तसेच राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर, महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही जिल्ह्यातील फक्त नववी ते बारावीचे वर्ग सूरू करण्यात आलेले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या वर्गातील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, 23 एप्रिल पासून बारावीच्या तर 29 एप्रिल पासून दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

कोरोना संकटामुळे राज्यात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र दहावी-बारावीची परीक्षा कशी होणार, कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. दरम्यान, दहावी-बारावी परीक्षेबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरूवार दि. 21 जानेवारी दिली असून, बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे आणि निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल आणि निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले असून, राज्यातील दहावीच्या परीक्षा मे महिन्यात तर बारावीच्या परीक्षा या 15 एप्रिल नंतर घेण्यात येतील असे राज्य बोर्डचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले होते. आता मात्र परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, 23 एप्रिल पासून बारावीच्या तर 29 एप्रिल पासून दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub