हर्षद मेहता नंतर अश्याच अजून एका घोटाळ्यावर येणार नवी वेबसीरीज!

हर्षद मेहता नंतर अश्याच अजून एका घोटाळ्यावर येणार नवी वेबसीरीज!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे सिने इंडस्ट्रीला मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून, चित्रपटगृहे खुली करण्यात आलेली आहे. अलिकडेच अनेक सिनेमे हे चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले असून, या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळाला आहे. दरम्यान, ‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज कमी वेळात प्रचंड गाजली. 1992 सालच्या भारतातल्या स्टॉक मार्केट घोटाळ्यावर आधारीत ही वेबसीरीज होती. या सीरीजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. यानंतर आता अश्याच अजून एका घोटाळ्यावर नवी वेबसीरीज येणार असल्याची घोषणा सोनी लिव्हने केली आहे.

1992 सालच्या भारतातल्या स्टॉक मार्केट घोटाळ्यावर आधारीत ‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज कमी वेळात प्रचंड गाजली. हंसल मेहता यांचे दिग्दर्शन आणि त्याला प्रतिक गांधीसोबत इतर अनेक चांगल्या कलाकारांनी दिलेली साथ, ठेका धरायला लावणारे संगीत यांनी परिपूर्ण असलेल्या या सीरीजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. यानंतर आता अश्याच अजून एका घोटाळ्यावर नवी वेबसीरीज येणार असल्याची घोषणा सोनी लिव्हने केली असून, ही वेबसीरीज ‘स्कॅम 1992’चा सिक्वेल असेल ज्याचे नाव सध्या तरी ‘स्कॅम 2003: द क्युरीयस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी’ असे असल्याचे समोर आले आहे.

‘स्कॅम 2003: द क्युरीयस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी’ ही नवी वेबसीरीज 2003 च्या स्टँप पेपर घोटाळा प्रकरणावर असणार आहे. या सीरीजसाठी दिग्दर्शन हंसल मेहता यांचे आहे. ही तेलगी स्टोरी पत्रकार संजय सिंग यांच्या ‘रिपोर्टर की स्टोरी’ या पुस्तकावर आधारीत असणार आहे. संजय यांनीच हा 2003 सालचा घोटाळा समोर आणला होता. दरम्यान, ‘स्कॅम 1992’ मध्ये ज्याप्रमाणे हर्षद मेहताचे आयुष्य दाखवले होते, त्याप्रमाणे ‘स्कॅम 2003’ मध्ये अब्दुल करीम तेलगी याचे आयुष्य दाखविण्यात येणार आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे भारतातल्या अनेक शहरांमध्ये पसरलेले होते. साधारणपणे 20 हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा होता.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub