बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान कोरोनाच्या विळख्यात!

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान कोरोनाच्या विळख्यात!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, पुन्हा एकदा राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध घालण्यात येत आहेत. कोरोनामुळे सिने इंडस्ट्रीला देखील मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून, अनेक सिनेमे हे चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले आहेत. दरम्यान, बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची लागण झाली असून, आमिर खानच्या टीमने ही माहिती दिली आहे. सध्या आमिर खानने स्वत:ला होम क्वॉरंटाईन केले आहे.

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. आमिर सध्या घरीच क्वारंटाइनमध्ये राहत असून सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत असल्याची माहिती त्याच्या प्रवक्त्यांनी दिली. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांत आमिरच्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असेदेखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सोमवार दि. 22 मार्च रोजी जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेच्या कार्यक्रमात आमिरने हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

गेल्यावर्षी आमिरच्या घरातील सात कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या सात कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षारक्षक, ड्रायव्हर, घरात काम करणारे नोकर यांचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, कार्तिक आर्यन, वरुण धवन, नीतू सिंह यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण झाली होती. आता आमिर देखील कोरोनाच्या विळख्यात सापळला आहे. दरम्यान, आमिर खानने 14 मार्च रोजी आपला 56 वा वाढदिवस साजरा केल्या. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी आमिरने सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली होती. अलीकडेच तो ‘कोई जाने ना’ चित्रपटाच्या ‘हर फन मौला’ या गाण्यात दिसला. होता या गाण्यात तो अली अवरामसोबत डान्स करताना दिसला होता.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub