आमिर खान ने त्याच्या मुलासाठी घेतला पुढाकार

आमिर खान ने त्याच्या मुलासाठी घेतला पुढाकार

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सिने इंडस्ट्रीला मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून, देशात 15 ऑक्टोबरपासून नियम अटी देऊन चित्रपटगृहे खुली केली आहे. मात्र अद्याप महाराष्ट्र सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. दरम्यान, बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता आमिर खान चा मुलगा जुनैंद खान गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. जुनैदबाबत काही दिवसांपूर्वीच एक आश्चर्यकारक बाब समोर आली होती की, नीरज पांडे यांच्या प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या सिनेमाच्या ऑडिशनमध्ये जुनैदला रिजेक्ट करण्यात आले आहे.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता आमिर खान चा मुलगा जुनैंद खान ऑडिशनमध्येच रिजेक्ट झाला यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. दरम्यान, नीरज पांडे यांच्या प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या मल्याळम सिनेमा ‘इश्क’च्या हिंदी रिमेकमधून आमिर खान चा मुलगा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार होता. मात्र ऑडिशनमध्येच जुनैदला रिजेक्ट करण्यात आले आहे. आता अशी बातमी समोर येत आहे की, स्वत: आमिर खानने त्याच्या मुलासाठी पुढाकार घेतला असून, जुनैद खान आता यशराज बॅनरच्या (YRF) एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

माहिती नुसार, सत्यघटनेवर आधारित असणार हा सिनेमा सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित करणार असून, विपूल मेहता आणि स्नेहा देसाई यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे. यामध्ये जुनैद खान एका वर्तमानपत्राच्या संपादकाच्या रुपात दिसणार आहे. या सिनेमामध्ये ‘बंटी और बबली 2’ मधून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री शर्वरी वाघ जुनैदबरोबर असणार असून, हा सिनेमा 1862 मधील जादूनाथ जी बृजनाथ जी महाराज केसवर आधारित असणार आहे. वायआरएफकडून पुढील महिन्यातच या चित्रपटाची घोषणा केली जाऊ शकते.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub