‘सैराट’ चित्रपटातील एक जोडी पुन्हा करणार स्क्रीन शेअर

‘सैराट’ चित्रपटातील एक जोडी पुन्हा करणार स्क्रीन शेअर

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सिने इंडस्ट्रीला मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून, देशात 15 ऑक्टोबरपासून केंद्राने 50 टक्के प्रेक्षक संख्येसह इतर नियम अटी देऊन चित्रपटगृहे खुली केली आहे. मात्र अद्याप महाराष्ट्र सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. दरम्यान, 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट ‘सैराट’ने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावल होत. यातील कलाकार मंडळींनी प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली. आता पुन्हा एकदा या चित्रपटातील एक जोडी एकत्र स्क्रीन शेअर करण्यास सज्ज झाली आहे.

29 एप्रिल 2016 रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने सर्वांनाच याड लावल. या चित्रपटातले प्रत्येक गाणे आणि संवाद सुपरहिट ठरले. त्यासोबतच यातील कलाकार मंडळींनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या भूमिका साकारणाऱ्या नवोदित कलाकारांनी पहिल्याच चित्रपटातून त्यांच्यातील अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली. दरम्यान, आयुष्याच्या वळणावर अनेक माणसे आपल्याला भेटत असतात. मात्र, यात मैत्रीच नात फार कमी जणांशी जोडता येते. हेच मैत्रीचे नात सैराट चित्रपटात सल्या आणि लंगड्या यांच्यात पाहायला मिळाले.

परशाला त्याचे प्रेम मिळवून देण्यासाठी सल्या आणि लंगड्या या दोघांनी केलेली धडपड प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र काम करण्यास सज्ज झाली असून, सुनील मगरे यांच्या ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटामध्ये सल्या आणि लंगड्या म्हणजेच अरबाज व तानाजी स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटामध्येदेखील त्यांची भन्नाट मैत्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उमेश नरके, धर्मेंद्र सिंग, प्रसाद शेट्टी, विकास कांबळे, प्रवीण जाधव यांनी सांभाळली आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार हे मात्र अद्याप सांगण्यात आलेले नाही.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *