‘लक्ष्मी बॉम्ब’ मधून होतो लव्ह जिहादचा प्रचार : ट्रोलर्स

‘लक्ष्मी बॉम्ब’ मधून होतो लव्ह जिहादचा प्रचार : ट्रोलर्स

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सिने इंडस्ट्रीला मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून, देशात 15 ऑक्टोबरपासून केंद्राने 50 टक्के प्रेक्षक संख्येसह इतर नियम अटी देऊन चित्रपटगृहे खुली केली आहे. दरम्यान, बॉलीवूडचा स्टार अभिनेता खिलाडी अक्षय कुमार याचा लक्षवेधी चित्रपट लक्ष्मी बॉम्ब हा पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. त्यावरुन देशात आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

आपल्याकडे कुठल्याही एखाद्या कलाकाराचा चित्रपट प्रदर्शित व्हायचा अवकाश त्यापूर्वी वाद घडवून आणण्याला जास्त महत्व दिले जाते. विशेष म्हणजे चित्रपट न पाहता त्यावर बंदी घालण्याची मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येते. दरम्यान, अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’ चा प्रचार आणि प्रसार होत असल्याचा आरोप सोशल माध्यमांवर सुरु झाला असून, त्याला मोठ्य़ा प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी ट्रोलर्सकडून करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यावेळी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यावरुन कुठलाही वाद होईल याची कल्पना कुणाला नव्हती. आता मात्र त्याला सुरुवात झाली आहे. काय तर म्हणे या चित्रपटाच्या नावात ‘लक्ष्मी’ हा शब्द असल्याने काही प्रेक्षक संतापले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमारने हिंदू देवतांचा अपमान केला आहे. शिवाय चित्रपटात हिंदू-मुस्लिम तरुणांचे प्रेमप्रकरण दाखवून लव्ह जिहादचा प्रचार केला जात आहे, अशीही टीका काही प्रेक्षक करत आहेत.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, येत्या 9 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल 125 कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *