ड्रग्स प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार?

ड्रग्स प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार?

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या या काळात अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या घरात घळफास घेवून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, सुशांत आत्महत्ये प्रकरणी चौकशी सुरु असताना ड्रग्ज सेवन प्रकरण समोर आले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक करत असलेल्या चौकशीमध्ये सारा अली खानचे नाव समोर आले असता, एनसीबीकडून साराची चौकशी करण्यात आली होती.

बॉलिवूडचा नवाब आणि साराचा वडील सैफ अली खानने तिला ड्रग्ज सेवन प्रकरणात मदत करण्यास नकार दिला असल्याचे समोर आले आहे. एका वृत्तानुसार सैफने साराला मदत करण्यास नकार दिला आहे. तसेच साराचे नाव ड्रग्ज प्रकरणात येताच सैफने पहिली पत्नी अमृता सिंहला देखील सुनावले आहे. सध्या सैफ तैमुर आणि करीना कपूरसोबत दिल्लीला निघून गेला आहे. तेथे करीनाचा आगामी चित्रपट लालसिंग चड्ढाचे चित्रीकरण सुरु आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी चौकशी सुरु असताना ड्रग्ज सेवन प्रकरण समोर आले. या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीदरम्यान दीपिका पदूकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर यांची नावे समोर आली होती. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने दीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुल प्रीत यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, शनिवार दि. 26 सप्टेंबर रोजी साराची एनसीबीने चौकशी केली.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published.