सुशांत प्रकरणातील संशयित आरोपींना 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सुशांत प्रकरणातील संशयित आरोपींना 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई (प्रतिनिधी) : सुशांत सिंग राजपूत याने आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुप्रीम कोर्टाने सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला असून, हा तपास अंमली पदार्थ तस्करी आणि सेवनापर्यंत आला आहे. दरम्यान, रिया चक्रवर्तीला यासाठी अटकही झाली आहे. मात्र, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह इतर आरोपींच्या जामीन अर्जावरील निकाल हायकोर्टाने राखून ठेवला आहे.

एनसीबीसाठी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू केवळ इतकीच या केसची व्याप्ती नाही. सुशांतने या ड्रग्ज रॅकेटमधून अंमलीपदार्थ घेतले की नाही घेतले यापुरता हा तपास मर्यादीत नाही. यानिमित्ताने समाजात पसरलेले हे ड्रग्जचे जाळ नष्ट करणे हा मुळ उद्देश आहे. एखादी व्यक्ती ड्रग्ज घेत असल्यास त्याची माहिती दडवण हेदेखील त्याला मदत करून उद्युक्त केल्यासारखेच आहे, असा दावा एनसीबीच्यावतीने रिया चक्रवर्तीच्या जामीनाला विरोध करताना करण्यात आला.

मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दिपेश सावंतसह ड्रग्ज पेडलर झैद विलात्रा आणि बासित परिहार यांना जामीन नाकारत 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान सुशांत सिंह आता हयात नाही, मग तो ड्रग्ज कुणाकडून घेत होता, हे कसे सिद्ध करणार? असा सवाल हायकोर्टाने यावेळी उपस्थित केला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published.