इस्लामसाठी सना खानने सोडला बॉलिवूड!

इस्लामसाठी सना खानने सोडला बॉलिवूड!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सिने इंडस्ट्रीला मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, अभिनेत्री झायरा वसिमनंतर आता आणखी एका अभिनेत्रीने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खानसोबत काम केलेली आणि ‘बिग बॉस’ मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री सना खानने तिच्या धर्माला आधार मानत बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या आधी अभिनेत्री झायरा वसिम हिनेसुद्धा इस्लामसाठी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता.

सना खानने गुरुवारी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तिने इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचे म्हटले आहे. सनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, आज मी माझ्या आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आली आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि त्या काळात मला प्रसिद्धी, पैसा, सन्मान या सर्व गोष्टी मिळाल्या. पण पैसा आणि प्रसिद्धीच्याच मागे धावणे हा एकमेव जगण्याचा उद्देश आहे का, असा प्रश्न मला सतावू लागला.

सना खानने पुढे लिहिले की, गरजू व्यक्तींना मदत करण्याचे कर्तव्य प्रत्येकाचे नाही का? या प्रश्नांची उत्तर मी बऱ्याच काळापासून शोधत होते. जेव्हा मी माझ्या धार्मिक शिकवणीत या प्रश्नांची उत्तर शोधली, तेव्हा मला समजले की फक्त पैसा आणि प्रसिद्धी कमावणे हाच आयुष्याचा एकमेव उद्देश नाही. त्यामुळे मी आजपासून फिल्म इंडस्ट्रीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेते आहे आणि यापुढे मी लोकांची, गरजूंची सेवा करेन.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *