प्रियंकाचा ‘द व्हाइट टायगर’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

प्रियंकाचा ‘द व्हाइट टायगर’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सिने इंडस्ट्रीला मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून, देशात 15 ऑक्टोबरपासून केंद्राने 50 टक्के प्रेक्षक संख्येसह इतर नियम अटी देऊन चित्रपटगृहे खुली केली आहे. दरम्यान, बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. प्रियंका कायम चाहत्यांसोबत जुडून राहण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र प्रियंका लवकरच ‘द व्हाइट टायगर’ या आगामी चित्रपटात झळकणा आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच राजकुमार राव आणि प्रियंका एकत्र दिसणार आहेत.

सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रियंकाची चर्चा सुरु झाली आहे. अरविंद अडिग यांच्या ‘द व्हाइट टाइगर’ या पुस्तकावर आधारित ‘द व्हाइट टाइगर’ या चित्रपटात प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार असून ती पिंकी नामक भूमिका साकारत आहे. या चित्रपटात प्रियंका सोबत अभिनेता राजकुमार राव स्क्रीन शेअर करणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून, हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एका कुटुंबाची आणि एका मुलीच्या संघर्षाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाबाबत प्रियांका म्हणाली की, या चित्रपटामध्ये मी पिंकी नामक भूमिका साकारत आहे. आतापर्यंत मी अनेक नवोदित कलाकारांसोबत काम केले मात्र, आदर्श गौरव हा अत्यंत हुशार आणि गुणी अभिनेता आहे. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शक रमिन बहरानी करणार आहेत. तर मुकुल देवडा या चित्रपटाची निर्मिती करत आहे. विशेष म्हणजे प्रियांका या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासोबतच एक्झिकेटिव्ह प्रोड्युसरची भूमिकादेखील पार पाडणार आहे. प्रियांका आणि राजकुमार रावसोबतच अभिनेता आदर्श गौरवदेखील स्क्रीन शेअर करणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub