रँम्बोच्या रिमेक मधून टायगर श्रॉफची माघार!

रँम्बोच्या रिमेक मधून टायगर श्रॉफची माघार!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे सिने इंडस्ट्रीला मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून, चित्रपटगृहे खुली करण्यात आलेली आहे. अलिकडेच अनेक सिनेमे हे चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले असून, या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळाला आहे. दरम्यान, बॉलीवूडला हॉलीवूडच्या प्रसिध्द चित्रपटांवर रिमेक करण्याचा मोह काही आवरत नाही. बॉलीवूड नेहमी कॉपी पेस्ट करण्याच्या शोधात असते. कधी टॉलीवूडच्या तर कधी हॉलीवूडच्या चित्रपटांची कॉपी करुन स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची बॉलीवूडची जूनीच सवय आहे. बॉ़लीवूडमध्ये आता रँम्बोचा रिमेक येणार असून, त्याची तयारीही सुरु झाली आहे.

हॉलीवूडचा प्रसिध्द चित्रपट रँम्बो कुणाला माहिती नाही, असे होणार नाही. ज्या चित्रपटाने सिल्वेस्टर स्टॅलोनला स्टार बनवले त्या चित्रपटाची निर्मितीकथाही तितकीच प्रेरणादायी आहे. सिल्वेस्टरचा प्रवास अचंबित करणारा आहे. रॅम्बोने त्याला वेगळी ओळख दिली. हॉलीवूडच्या क्षितिजावर तो चमकला त्याला कारण आहे रॅम्बो, त्या चित्रपटाचे लेखन त्याने केले होते. आता मात्र, बॉ़लीवूडमध्ये रँम्बोचा रिमेक येणार असून, त्याची तयारीही सुरु झाली आहे. सुरुवातीला या चित्रपटात रँम्बोची भूमिका टायगर श्रॉफ करणार असल्याची माहिती होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची भावना होती. मात्र टायगरचा आनंद फारकाळ टिकला नाही.

रॅम्बोच्या रिमेकमध्ये आता साऊथचा प्रसिध्द अभिनेता प्रभास मुख्य भूमिका करणार असल्याची चर्चा आहे. बाहुबली नंतर प्रभासच्या पारड्यात मोठमोठ्या चित्रपटांच्या ऑफर पडल्या आहेत. आता तर साक्षात रँम्बोच करायला मिळणार आहे. खरे तर अनेक दिवसांपूर्वीच टायरगरच्या रँम्बो या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी त्या चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले होते. आता मात्र प्रभास ती भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. त्याचे दुसरे कारण म्हणजे टायगरला रँम्बोच्या शुटिंगकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे त्याने त्या चित्रपटातून आपला सहभाग काढून घेतला आहे.

रॅम्बोच्या रिमेकचे ज्यावेळी पोस्टर प्रदर्शित झाले होते तेव्हा प्रेक्षकांमध्ये कमालीचा आनंद होता. टायगरच्या त्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यात तो हुबेहुब रँम्बो सारखा दिसत होता. मात्र आता त्याने हा चित्रपट सोडला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या रिमेकचे दिग्दर्शन रोहित धवन हे करणार आहेत. त्यात त्यांच्या टीममध्ये सिध्दार्थ आनंद हे असणार आहेत. सिध्दार्थ आता या चित्रपटाच्या अनुषंगाने प्रभासशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. त्याने आतापर्यत दोनवेळा प्रभासची भेटही घेतली आहे.  सिध्दार्थ आनंद हे प्रभासच्या संपर्कात असून सध्या रँम्बोबद्दल प्राथमिक बोलणी सुरु आहेत. प्रभासला या चित्रपटाची स्टोरी आवडली आहे. आता यासगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की, प्रभासला या चित्रपटासाठी वेळ आहे की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

muzaffar