भारतीय बाजारपेठेत सोने चांदीच्या दरात घसरण

भारतीय बाजारपेठेत सोने चांदीच्या दरात घसरण

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशातील परिस्थिती खुप गंभीर झालेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसत आहे. जागतिक बाजारपेठेत गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक न करता अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करत असल्यांचे दिसत आहेत. याचाच परिणाम सध्या देशातील सोन्याचे दर अस्थिर असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, सोन्याच्या दरात गुरूवार दि. 19 नोव्हेंबर रोजी घसरण झाली असून, सोने 125 रुपयांनी स्वस्त होऊन 50 हजार 200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

भारतीय बाजारपेठेतील सोन्याच्या दरातील घसरण सुरुच असून गुरूवारी सोन्याच्या दरात घट झाली आहे. मागील सत्रात सोने 50 हजार 325 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाले होते. जे आता 125 रुपयांनी स्वस्त होऊन 50 हजार 200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. सोन्याचा दर मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहेत. सत्राच्या सुरुवातीला सोन्याचे दर 50 हजार 149 रुपयांपर्यंत गेले होते. मागील काही दिवसांपासून कोरोना लशींच्या सकारात्मक बातम्यांमुळे सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचे दिसले आहे.

भारतात 2020 मध्ये जागतिक पातळीनुसार सोन्याच्या किमती 31 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ऑगस्टमध्ये भारतात सोन्याच्या दराने 56 हजार 200 चा विक्रमी उच्चांक गाठला, तर चांदी प्रति किलो 80 हजारांच्या आसपास होती. सणासुदीच्या काळात भारतात सोन्याची मागणी वाढेल अशी आशा विश्लेषकांनी व्यक्त केली. दरम्यान, रुपयाच्या किंमतीत सुधारणा झाल्याने आणि सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरन होत असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे चांदीचे दर देखील खालावले आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub