पेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून होणार सुटका!

पेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून होणार सुटका!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : कोरोनामुळे देशात अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे अनेक राज्यांत लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. आता मात्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांतील लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले असून, रहदारी वाढली आहे. अशातच मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तेल कंपन्यानी बुधवार दि. 12 मे रोजी पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ केली असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी 25-25 पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे.

देशभरातील ग्राहक पेट्रोलच्या सतत वाढत्या किंमतींमुळे त्रस्त झाले आहेत. त्यातून पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर सरकारचे नियंत्रण नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. कारण पेट्रोल-डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारत निश्चित होतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर कोणत्याही प्रकारचा निर्णय सरकार घेवू शकत नाही. पण सरकारकडे यावर एक पर्यायी उपाय आहे. पेट्रोलच्या जागी एक असं इंधन येईल ज्याचे दर फार कमी असतील. तर या इंधनाचं नाव आहे इथेनॉल. येत्या 8 ते 10 दिवसांत केंद्र सरकार फ्लेक्स फ्यूल इंजिन वर मोठा निर्णय घेणार असून, ऑटोमोबाईल उद्योगासाठी अशी इंजिन अनिवार्य करण्यात येणार आहेत.

देशाचे रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार फ्लेक्स फ्यूल या पर्यायी इंधनाची किंमत 60 ते 62 रूपये प्रति लिटर असणार आहे. देशात सध्या पेट्रोलचे दर 103 रूपयांवर गेल्यामुळे इथेनॉल उत्तम इंधन असल्याचे सांगितले जात आहे. इथेनॉल इंधनाचा वापर केल्यास पेट्रोल ग्राहकांचे 30 ते 35 रूपये वाचणार आहेत. नितीन गडकरी म्हणाले, मी परिवहन मंत्री आहे.  फक्त पेट्रोल इंजिन नाही तर फ्लेक्स-फ्यूल इंजिन तयार करण्याचे आदेश मी जारी केले आहेत. ज्यामुळे ग्राहकांपुढे आता दोन पर्याय असणार आहेत. एक म्हणजे 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करणे किंवा 100 टक्के इथनॉलचा वापर करणे.

गडकरी पुढे म्हणाले की, ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेतील वाहन कंपन्या फ्लेक्स इंधन तयार करतात. या देशांमध्ये, ग्राहकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 10 टक्के बायो इथेनॉलचा पर्याय प्रदान केला जात आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आयातीवर कमी आवलंबून राहण्यासाठी पेट्रोलसह 20 टक्के  इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले गेले होते, गेल्या वर्षी सरकारने 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल आणि 2030 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे म्हटले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub