निर्बंध वाढवण्याची गरज असेल तर विचार केला जाऊ शकतो : व्ही.के.पॉल

निर्बंध वाढवण्याची गरज असेल तर विचार केला जाऊ शकतो : व्ही.के.पॉल

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकार चिंतेत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अनेक राज्यांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. परिस्थिती बिघडू लागल्याने अनेक राजकीय नेते आणि तज्ञ केंद्र सरकारला देशात लॉकडाउन लावण्याचा सल्ला देत आहे. यामुळे केंद्र सरकार देशात लॉकडाउन लावणार का? अशी विचारणा होत असून, यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लॉकडाउनचा विचार करण्याचे संकेत दिले आहेत.

देशात एकीकडे अनेक तज्ञ आणि राजकीय नेते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी पंतप्रधानांना लॉकडाउन लावण्याचा सल्ला देत असताना निती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी सांगितले की, 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर आणि 60 टक्क्यांहून अधिक आयसीयू बेड्सची व्याप्ती असणाऱ्या राज्यांना आधीच नाईट कर्फ्यू आणि कठोर निर्बंध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्पष्ट आणि संतुलित नियमावली देण्यात आली आहे. त्याचवेळी अजून काही निर्बंध वाढवण्याची गरज असेल तर त्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो आणि गरजेप्रमाणे ते निर्णय घेतले जातील, असे पॉल यांनी सांगितले आहे.

दरम्यान, याआधी टास्क फोर्सने केंद्र सरकारला काही शिफारशी केल्या होत्या. यामध्ये लॉकडाउनचाही उल्लेख होता. टास्क फोर्सने केंद्राला सूचनांचा स्विकार करताना लॉकडाउनच्या चर्चेच्या पुढे यावर विचार केला पाहिजे असे म्हटले होते. संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव पर्याय नसून अनेक गोष्टी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते. योग्य ठिकाणी लक्ष्य देत आणि समनव्य साधत परिस्थितीला हाताळणे गरजेचे आहे, असे टास्क फोर्सने सांगितले होते. यावेळी त्यांनी सर्वाधिक फटका बसणाऱ्यांसाठी योग्य कार्यक्रम आणि सुरक्षा जाळे निर्माण होईल याची खात्री करण्याचाही सल्ला दिला असून, संपूर्ण लॉकडाउनची मागणी केली जात असली तरी हा पर्याय नसल्याचे टास्क फोर्सने केंद्र सरकारने सांगितले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub