कामाच्या तासांत होणार वाढ!

कामाच्या तासांत होणार वाढ!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचे विषाणू सर्वोत्र पोहोचले. त्यामुळे परिस्थिती खुप गंभीर झाली होती. आता मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, गेल्या काही दिवसांत कोरोनाचा जोर कमी झाला होता. दरम्यान, कामगार मंत्रालयाने संसदेत नुकतीच एक संहिता पास केली असून, मंत्रालयाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या अटी संहिता 2020 च्या समूदा नियमाअंतर्गत अधिकतम 12 तास काम करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

कामगार मंत्रालयाने संसदेत नुकतीच एक संहिता पास केली आहे. त्यानुसार कामाच्या तासांमध्ये वाढ करुन 12 तास प्रतिदिवस करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या दरम्यान ब्रेकचाही समावेश आहे. 19 नोव्हेंबर 2020 रोजी अधिसूचित केलेल्या या मसूद्यात आठवड्यातील कामाचे तास 48 इतके ठेवण्यात आले आहे. सध्याच्या नियमांनुसार आठवड्यातील एक दिवस सुट्टी आणि 6 दिवसातील प्रत्येक दिवशी 8 तास कामाचे असतात. कामगार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ही पद्धत भारतातील परिस्थिती पाहून ठरविण्यात आली आहे.

कामगार मंत्रालयाने संसदेत पास केलेल्या संहितेमुळे कामगाराला ओव्हरटाइमच्या भत्त्याच्या माध्यमातून अधिक कमवण्याची सुविधा मिळणार आहे. ओएसएच संहिताच्या मसूदा नियमांनुसार कोणत्याही दिवशी ओव्हरटाइममध्ये 15 ते 30 मिनिटांची वेळ 30 मिनिटांपर्यंत धरली जाईल. मसुद्यानुसार कोणताही व्यक्ती कमीत कमी अर्ध्या तासाच्या मध्यांतराशिवाय 5 तासांहून अधिक सतत काम करणार नाही. दरम्यान, मसुदेतील नियमांनुसार कोणत्याही कामगाराला आठवड्यात 48 पेक्षा जास्त वेळ काम करण्याची आवश्यकता नाही. कामाच्या तासांची अशा प्रकारे आखणी करावी लागेल ज्यात ब्रेकच्या वेळेसह कोणत्याही दिवशी कामाचे तास 12 हून अधिक असता कामा नये.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *