मोदी सरकार भारताचे रुपांतर वाईट देशामध्ये करत आहे : इम्रान खान

मोदी सरकार भारताचे रुपांतर वाईट देशामध्ये करत आहे : इम्रान खान

पाकिस्तान : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक लस तयार करण्याचे महत्त्वाचे काम करत असून, देशात लसीकरणाला देखील सूरूवात झाली आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. देशात विरोधी पक्षांकडून या संवादाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही गोस्वामी यांच्या व्हायरल झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 2019 मध्ये मी संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना भारतातील फॅसिस्ट मोदी सरकारने देशातील निवडणुकीसाठी बालाकोट संकटाचा वापर केला. एका भारतीय पत्रकाराच्या संवादातून हा नवीन खुलासा झाला आहे. हे पत्रकार त्यांच्या तापटपणामुळे ओळखले जातात. या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून मोदी सरकार आणि भारतीय माध्यमांमध्ये असलेले चुकीच्या संबंधाचाही खुलासा झाला आहे. ज्यातून हेच दिसत आहे की, संपूर्ण खंडात अस्थिरता निर्माण होण्याच्या परिणामतेकडे दुर्लक्ष करून निवडणूक जिंकण्यासाठी हे धोकादायक लष्करी धाडस केले. पाकिस्तानने बालाकोट संकट जबाबदारीने टाळले. तरीही मोदी सरकार भारताचे रुपांतर वाईट देशामध्ये करत आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

इम्रान खान पुढे म्हणाले की, पाकिस्तानातील दहशतवादामागे भारतीय प्रायोजकत्व, भारतव्याप्त जम्मू काश्मीर आणि आमच्याविषयी 15 वर्षापासून चुकीची माहिती पसरवणारी मोहीम या चॅटमुळे उघडकीस आली आहे. आता भारतातील माध्यमांनी आपले संबंध उघड केले आहेत, जे आण्विक क्षेत्राला संघर्षाच्या टोकाकडे ढकलत आहेत. इम्रान खान यांनी पुढे म्हटले आहे की, मी पुन्हा एकदा हे सांगतो की, माझे सरकार पाकिस्तान आणि मोदी सरकारच्या फॅसिस्टवादाविरुद्ध युद्धजन्य डाव उघडे पाडत राहिले. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला बेजबाबदार आणि लष्करी अजेंड्यापासून थांबवायला हवा. कारण मोदी सरकार संपूर्ण खंडाला एका संघर्षामध्ये ढकलू शकते.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub