विरुष्काच्या घरी झाले नव्या पाहुण्याचे आगमन!

विरुष्काच्या घरी झाले नव्या पाहुण्याचे आगमन!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना साथीच्या काळात भारतीय संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर गेला असून, भारताने एकदिवसीय मालिका गमावल्या नंतर तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1 ने जिंकली. ऑस्ट्रेलिया विरोधात कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळून भारताचा कर्णधार ‍विराट मायदेशी परतला, कारण जानेवारीमध्ये अनुष्का आणि विराटला अपत्यप्राप्ती होणार होते. दरम्यान, विरूष्काच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले असून, विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

विराट कोहलीने पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचे सौभाग्य आहे की, जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे, असे विराटने म्हटले आहे. दरम्यान, विराट कोहलीने 11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली होती.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे विराट कोहलीने अनुष्का गरोदर असल्याची माहिती दिली होती. विराट आणि अनुष्काबद्दल हा खुलासा झाल्यानंतर दोघही ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात झाली होती. आता ‘विरुष्का’च्या घरी मुलगीचे आगमन झाले आहे. दरम्यान, विराट कोहली आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी कसोटी मालिका सोडून तो ऑस्ट्रेलियाहून भारतात परतला आहे. एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळल्यानंतर त्याने अ‍ॅडलेडमधील पहिल्या कसोटीतही भाग घेतला. पण त्यानंतर, शेवटचे तीन कसोटी सोडून तो भारतात परत आला.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub