भारत बायोटेककडून कोवॅक्सिनच्या वापरासाठी नव्या गाईडलाईन्स जारी!

भारत बायोटेककडून कोवॅक्सिनच्या वापरासाठी नव्या गाईडलाईन्स जारी!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक लस तयार करण्याचे महत्त्वाचे काम करत असून, कोरोनाव्हायरविरुद्धची जगातील सर्वात मोठी मोहीम भारतीय भूमीवर शनिवार दि. 16 जानेवारीपासून सुरु झाली आहे. दरम्यान, भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन लसीसंदर्भात काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये कंपनीने काही विशिष्ट आजारांवर उपचार घेणाऱ्यांनी ही लस घेऊ नये, असे स्पष्ट केले आहे. मात्र, या गाईडलाईन्समुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील एक वर्षापासून देशातील जनता धास्तावलेली होती. कोरोनाच्या संसर्गावर कोणतीही लस नसल्याने केवळ प्रतिबंधात्मक उपाय करणे एवढेच नागरिकांच्या हाती होते. कोरोनावरील प्रभावी लस येणार असे ज्यावेळी सांगण्यात येत होते, त्यावेळी ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच, फ्रंट लाईन वर्कर्स यांच्यापाठोपाठ आजारी रुग्णांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता भारत बायोटेकच्या वतीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या असून, त्यामधून काही आजार असणाऱ्या, तसेच गरोदर महिलांनी लस घेऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना रक्ताशी संबंधित आजार आहे किंवा ब्लड थीनर्सचा त्रास आहे त्यांनी कोवॅक्सीन घेऊ नये असे सांगण्यात आले आहे. सध्या जे आजारी आहेत, ज्यांना मागील काही दिवसांपासून ताप किंवा एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी आहे, त्यांनी देखील कोवॅक्सीन घेऊ नये. याव्यतिरिक्त गरोदर महिला आणि ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिला म्हणजेच, नवजात बालकांच्या मातांनीही ही लस घेऊ नये असे देखील सांगण्यात आले आहे. दरम्यान, भारत बायोटेकच्या वतीने जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्समुळे मात्र संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान, स्वदेशी लस भारत बायोटकला आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर अनेकांनी लसीच्या सुरक्षितेविषय प्रश्न उपस्थित केले होते. कोवॅक्सिनची सुरक्षा, तिचा दर्जा, त्यामुळे होणारे परिणाम यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याचदरम्यान, भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी कोवॅक्सीन 200 टक्के सुरक्षित असल्याचे म्हटले होते. मात्र आता भारत बायोटेकच्या वतीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या असून, त्यामधून काही आजार असणाऱ्या, तसेच गरोदर महिलांनी लस घेऊ नये असे स्पष्ट केले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub