पाकिस्तानकडून लस पुरवठयासाठी अजून विनंती नाही : परराष्ट्र मंत्रालय

पाकिस्तानकडून लस पुरवठयासाठी अजून विनंती नाही : परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जग हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. कोरोनाव्हायरविरुद्धची जगातील सर्वात मोठी मोहीम भारतीय भूमीवर 16 जानेवारीपासून सुरु झाली असून, देशात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. दरम्यान, देशात लसीकरणाला सुरुवात झालेली असताना, मोदी सरकारकडून लस डिप्लोमसीही जोरात सुरु आहे. नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, सेशेल्स, मॉरिशेस या शेजारी देशांना भारताने लसींचा साठा पाठवला असून, पाकिस्तानलाही लसीचा पुरवठा करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, पाकिस्तानकडून लस पुरवठ्यासाठी अजून विनंती आलेली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील एक वर्षापासून जगभरातील लोक धास्तावलेले होते. कोरोनाच्या संसर्गावर कोणतीही लस नसल्याने केवळ प्रतिबंधात्मक उपाय करणे एवढेच नागरिकांच्या हाती होते. आता मात्र, देशात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. देशात लसीकरणासोबतच लस डिप्लोमसीही जोरात सुरु आहे. नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, सेशेल्स, मॉरिशेस या शेजारी देशांना भारताने लसींचा साठा पाठवला असून, सध्याच्या घडीला लस जीवरक्षक असल्याने सगळयाच देशांना कोरोना प्रतिबंधक लस हवी आहे.

भारत माणुसकीच्या दृष्टीने शेजारी देशांना मदत करत असला, तरी चीन-पाकिस्तान बरोबर भारताचे संबंध सामान्य नाहीत. दहशतवादाला प्रोत्साहन देणे, भारतावर हल्ले घडवणे या पाकिस्तानच्या प्रवृत्तीमुळे दोन्ही देशांच्या संबंधात नेहमीच तणाव असतो. पाकिस्तानने निर्माण केलेला दहशतवादाचा राक्षस आज त्यांच्यावरच उलटला आहे. पण अजूनही पाकिस्तान सुधरलेला नाही. अशात, भारत पाकिस्तानला लस पुरवठयाचा विचार करणारा का? असा मुद्दा उपस्थित केला जात असला तरी मात्र, पाकिस्तानकडून लस पुरवठयासाठी अजून कोणतीही विनंती आलेली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगण्यात आले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub