पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ सूरूच!

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ सूरूच!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे देखील सामान्याच्या समस्या वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने मागील 25 महिन्यांतील उच्चांक गाठला होता. आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असून, मंगळवार दि. 19 जानेवारी रोजी सुद्धा राज्यात बहुतांश भागांमध्ये पेट्रोलच्या दरांनी नव्वदी पार केली, तर डिझेलचे दरही प्रतिलीटर 80 रुपयांपलीकडेच असल्याचे पाहायाला मिळत आहे.

वाहन इंधनाच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्य वाहन धारकांपुढे आता मोठी आव्हाने उभी करत आहे. फक्त राज्यातच नव्हे, तर देशातही हीच परिस्थिती आहे. देशात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याचे हे सत्र सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ही वाढ झाल्याची बाब निदर्शनास येत आहे. दरम्यान, राज्यात बहुतांश भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत उच्चांकी वाढ झाली असून, परभणी जिल्ह्यात पेट्रोल हे 94.16 रूपये लीटर यादराने विक्री होत आहे तर, डिझेलचे दर हे 83.17 रूपये लीटर आहेत.

मुंबईमध्ये पेट्रोल हे 91.56 रूपये लीटर यादराने विक्री होत आहे तर, डिझेलचे दर हे 81.70 रूपये लीटर आहेत. बुलढाणा  जिल्ह्यात पेट्रोल हे 91.84 रूपये तर, डिझेल हे 81.96 रूपये लीटर या दराने विक्री होत आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात पेट्रोल 94.5 रूपये तर डिझेल 82.89 रूपये लीटर आहे. गडचिरोलीत पेट्रोलचे दर हे 92.75 रूपये तर डिझेल 81.86 रूपये इतके आहे. रायगड जिल्ह्यात पेट्रोल 91.53 रूपये तर डिझेल 80.61 रूपये, मनमाडमध्ये पेट्रोल 91.45 आणि डिझेल 80.57 रूपये, चंद्रपूरमध्ये पेट्रोल 91.76 आणि डिझेल 80.90 रूपये, वर्धा जिल्ह्यात पेट्रोल 92.14 रूपये तर डिझेल 81 रूपये, पालघरमध्ये पेट्रोल 92.14 आणि डिझेल 81.20 रूपये, धुळे जिल्ह्यात पेट्रोल 90.71 आणि डिझेल 80.83 रूपये तर रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोल हे 93.12 रूपये तर डिझेल हे 82.20 रूपये लीटर यादराने विक्री होत आहे.

लोकांच्या मानसिकतेत अर्धवट माहितीची भर टाकून पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ठरत असल्याचे सरकारकडून सांगितले जाते. पण, हे अर्धसत्य असल्याचे पेट्रोल डिलर असोसिएशनचेेेेेेेेेेे म्हणणे आहे. जेव्हा कच्च्या तेलाच्या दरात जागतिक पातळीवर वाढ होते, तेव्हा सरकार लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवते. मात्र, जेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती कमी होतात. तेव्हा मात्र लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले जात नाहीत. 2013 साली जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत 150 रुपये प्रति बॅरल होती. तेव्हा पेट्रोल 75 तर डिझेल 65 रुपये प्रतिलीटर होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत 52 रुपये प्रतिबॅरल असताना पेट्रोल नव्वदी पार तर डिझेल 80 पार पोहचले आहे.

सध्या पेट्रोलचा दर 91 रुपये प्रतिलीटर दिसत असला तरी केंद्र सरकारला त्यासाठी प्रतिलीटर सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयेच मोजावे लागतात. तर उरलेले 63 ते 64 रुपये सरकारकडून वेगवेगळ्या करांच्या नावाखाली वसूल केले जातात. एका लिटरमागे लोकांना 32 रुपये 98 पैसे एक्साईज ड्युटी म्हणून द्यावे लागतात. व्हॅटच्या स्वरुपात 15 रुपये 91 पैसे एका लिटरमागे साणान्यांना द्यावे लागतात. राज्य सरकारच्या सेससाठी प्रतिलीटर पेट्रोलसाठी दहा रुपये 12 पैसे द्यावे लागतात. तर पेट्रोलपंप चालकांच्या कमिशनपोटी एक लीटर पेट्रोलमागे तीन रुपये 64 पैसे द्यावे लागतायत आणि या सगळ्यांचा परिणाम पेट्रोल 91 रुपये प्रतिलीटरवर पोहोचण्यात झाला असून, डिझेलच्या बाबतीतही हेच चित्र आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub