यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार : हवामान विभाग

यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार : हवामान विभाग

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर एक आनंदाची बातमी म्हणजे, यंदा मान्सून केरळमध्ये वेळेत दाखल होणार असून, 1 जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदा सरासरीच्या 98 टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातले परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मान्सूनचा प्रवेश होतो. केरळमध्ये सर्वप्रथम मान्सूनचे आगमन होते. केरळमध्ये दरवर्षी 120 दिवसांच्या पावसाळ्यामध्ये सरासरी 204.9 सेंटिमीटर मान्सूनची नोंद होत असते.

यंदा मान्सून केरळमध्ये वेळेत दाखल होणार असून, यंदा सरासरीच्या 98 टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मागील दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबला होता. मात्र, सध्या अशी कोणतीही चिन्ह दिसत नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज असून, 15 ते 20 जून दरम्यान महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub