लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी लस टोचून घेणार!

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी लस टोचून घेणार!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक लस तयार करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. कोरोनाव्हायरविरुद्धची जगातील सर्वात मोठी मोहीम भारतीय भूमीवर 16 जानेवारीपासून सुरु झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ केला. दरम्यान, देशात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात असून, यानंतरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लस टोकून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील एक वर्षापासून देशातील जनता धास्तावलेली होती. कोरोनाच्या संसर्गावर कोणतीही लस नसल्याने केवळ प्रतिबंधात्मक उपाय करणे एवढेच नागरिकांच्या हाती होते. आता मात्र, संपूर्ण देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. दरम्यान, लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरु होणार, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, यानंतरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लस टोकून घेणार असल्याची माहिती समोर येत असून, ते लस केव्हा घेणार हे अद्याप समजू शकलेले नाही.

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस दिली जाणार आहे. सामान्य लोकांमध्ये लसीबाबत विश्वास आणि जनजागृती पसरवण्यासाठी पंतप्रधान आणि इतर नेते लस टोचून घेणार आहे. दरम्यान, लसीकरण मोहिमेची सुरुवात करताना मोदी म्हणाले होते की, दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस दिली जाईल. यानुसार पंतप्रधान मोदीही लस घेणार असून, मोदींसह देशातील आणखी काही नेते उदाहरणार्थ गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेते तसेच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही लस दिली जाणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub