शेतकरी ट्रॅक्टर रॅलीसंबंधी आम्ही कोणताही आदेश देणार नाही : सुप्रीम कोर्ट

शेतकरी ट्रॅक्टर रॅलीसंबंधी आम्ही कोणताही आदेश देणार नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : नव्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमलेले असून, देशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी या दिवशी शेतकरी संघटना कृषी कायद्याविरोधात सुरु असणारे त्यांचे आंदोलन सुरुच ठेवणार आहेत. दरम्यान, दिल्लीत शेतकरी संघटनांच्या प्रस्तावित 26 जानेवारी रोजी होणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चा विरोधात सुप्रीम कोर्टात दिल्ली पोलिसांकडून एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील बुधवार दि. 20 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी कोणताही आदेश देण्यास नकार दिला आहे.

शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिल्ली पोलिसांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले होते. दरम्यान, बुधवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी कोणताही आदेश देण्यास नकार दिला असून, कोर्टाने सांगितले की, नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीसंबंधी आम्ही कोणताही आदेश देणार नाही. याप्रकरणी पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणत्याही मेळावा किंवा मिरवणुकीस अनुमती देणे किंवा न देणे अनियमित आणि अयोग्य आहे आणि हा पोलिसांचा मुद्दा आहे. पोलीस याप्रकरणी निर्णय घेतील. आम्ही कोणताही आदेश देणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकरी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. ट्रॅक्टर रॅली काढण्यावर आंदोलक शेतकरी ठाम असून, या विरोधात सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने याचिका दाखक केलेली आहे. या याचिकेद्वारे केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाचे सेलिब्रेशन सुरु असताना मोर्चा न काढण्याचा आदेश शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने केंद्राला याचिका मागे घेण्याची परवानगी दिली असून, दिल्ली पोलिसांना निर्णय घेण्यास सांगितले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub