एक दिवा जवानांच्या नावाने प्रज्वलीत करा : पंतप्रधान मोदी

एक दिवा जवानांच्या नावाने प्रज्वलीत करा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण देश हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून अनेक बाबींना सुट दिली जात असली तरी मात्र, देशात कोरोनाच्या संकंटाने अनेक प्रथा, परंपरा मोडित निघाल्या असून, दसरा देखील ऑनलाईन साजरा करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून देशातील नागरिकांना दिवाळीनिमित्त एक दिवा जवानांच्या नावाने प्रज्वलीत करण्याचे आवाहन केले आहे.

देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अखंड खडा पहारा देत असलेल्या आपल्या बहादूर सैनिकांना मानवंदना म्हणून, एक पणती या दिवाळीमध्ये लावावी. आपले सैनिक दाखवत असलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दांनी न्याय देणे अवघड आहे. जे सैनिक सीमेवर आहेत, त्यांच्या कुटुंबियाविषयीही आमच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. अशा शब्दात ट्विटरवरुन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना आवाहन केले आहे. दरम्यान, पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी नियंत्रण रेषेला लागून जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सैनिकांसह दिवाळी साजरी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीही दिवाळी सीमेवर सैनिकांसह साजरे करणार आहेत, अशी बाब समोर आली आहे. दरम्यान, शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर येथे अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी सैन्याने केलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनाला उत्तर देताना भारतीय जवानांनी गोळीबारात 7 ते 8 पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना ठार मारले असून, पाकचे सुमारे 10 ते 12 सैनिक जखमी झाले आहेत आणि पाक लष्कराचे मोठ्या प्रमाणात बंकर व लाँच पॅड नष्ट करण्यात आले आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub