डब्ल्यूएचओकडून भारताच्या आरोग्य सेतू ऍपचे कौतुक

डब्ल्यूएचओकडून भारताच्या आरोग्य सेतू ऍपचे कौतुक

मुंबई (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. जगातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. असे असले तरी मात्र कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताकडून जे प्रयत्न केले जात आहेत, त्याचे कौतुक जागतिक स्तरावरही केले जात आहे. आधी धारावी मॉडेल आणि आता भारताच्या आरोग्य सेतू ऍपचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भारतानाने एप्रिल 2020 रोजी आरोग्य सेतू ऍप लाँच केले. देशातील कोरोना संक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी, नियंत्रणासाठी आणि अलर्टसाठी भारत सरकारने हे ऍप आणले. या ऍप बद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अदनोम घेब्रेयिसस यांनी सांगितले की, भारताचे आरोग्य सेतू ऍप 150 मिलियनपेक्षा अधिक युझर्सनी डाऊनलोड केले आहे. हे ऍपमुळे आरोग्य विभागाला शहरातील हॉटस्पॉट ओळखणे आणि वेळेत मदत पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडता आली.

जागतिक आरोग्य संघटनेने याआधी धारावी मॉडेलचेही कौतुक केले होते. धारावीतील घरांची रचना, गल्ली, लहान घरांमुळे सोशल डिस्टन्सिंग करणे अवघड जाते. त्यामुळे सुरुवातीपासून येथे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी पालिकेकडून प्रयत्न केला जात होता. त्यात सुरुवातीच्या दिवसात धारावीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र ही रुग्णसंख्या नंतर अत्यंत कमी झाली आहे. यामागे धारावीचे कोरोना मॉडेल फायदेशीर ठरले असल्याचे दिसून येत आहे. यासाठी डब्ल्यूएचओकडून धारावी मॉडेलचे कौतुक करण्यात आले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *