परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने मायदेशी पाठवणार मुंबई इंडियन्स!

परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने मायदेशी पाठवणार मुंबई इंडियन्स!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईत केले होते. पण आयपीएलच्या चौदाव्या हंगामावर देखील कोरोनाचे सावट कायम असून, आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल पुन्हा कधी आणि कुठे खेळवायचे याचा निर्णय नंतर परिस्थितीनुसार घेतला जाईल असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात असून, खेळाडू आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. यावेळी अनेक परदेशी खेळाडूंना निर्बंधांमुळे मायदेशी जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने परदेशी खेळाडू सुखरुप मायदेशी पोहोचावेत यासाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली आहे.

मुंबई इंडियन्स आपल्या संघातील परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार असून, ही विमाने दक्षिण आफ्रिकामार्गे न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजसाठी उड्डाण करतील. मुंबई इंडियन्स संघात ट्रेंट बोल्ट, अडम मिलने, जेम्स नीशम, शेन बाँड अशा न्यूझीलंडमधील अनेक खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने इतर संघातील परदेशी खेळाडूंनाही सोबत येण्यासाठी निमंत्रण दिले आहे. दरम्यान एक विमान पोलार्ड राहत असलेल्या त्रिनिदादसाठी उड्डाण करणार असून, हे विमान दक्षिण आफ्रिका मार्गे वेस्ट इंडिजला जाणार आहे. क्विंटन डी कॉक आणि मॅक्रो जेनसनसहित दक्षिण आफ्रिकाचे अनेक खेळाडू या विमानाने आपल्या मायदेशात पोहोचतील.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub